रत्नागिरी:-तालुक्यातील आरे खाडी येथे मासेमारी करण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा बूडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार 3 मार्च रोजी दुपारी 3.30 ते 5.30 वा.कालावधीत घडली आहे.याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बाबूराव राजाराम पारकर (57,रा. आरे मयेकरवाडी, रत्नागिरी) असे बूडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.याबाबत त्यांचा मुलगा प्रथमेश बाबूराव पारकर (28, रा.आरे मयेकरवाडी, रत्नागिरी) याने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली.त्यानूसार, बुधवारी दुपारी ते मासेमारी करण्यासाठी आरे खाडीत गेले होते.सायंकाळी 5.30 वा.सुमारास त्यांचा खाडीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला.याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.