रत्नागिरी:- शहरानजीकच्या आरटीओ रस्त्यावरील शाळेसमोर मंगळवार 2 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होउन अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकी चालक जखमी झाले असून त्यातील एकाला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे.
मंगळवारी सायंकाळी आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच- 08-जे- 4356) घेउन आरटीओ रस्त्यावरील इंग्लिश स्कुल येथून उजव्या बाजुचा इंडिकेटर देउन जात होता. त्याच सुमारास अभिजित पिलणकर हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएचब्-08- एबी- 5137) समोरुन येत असताना या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक होउन हा अपघात झाला. या अपघातात अजिंक्यला गंभीर दुखापत झाल्याने त्याला अधिक उपचारांसाठी कोल्हापूला नेण्यात आले तर अभिजितला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.









