आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांसाठी खुशखबर; रत्नागिरी-पनवेल अनारक्षित गाडीला प्रारंभ

गाडीला संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगावसह रोहा स्थानकावर थांबे

रत्नागिरी:- समर स्पेशल अनारक्षित गाड्यांपैकी रत्नागिरी ते पनवेल अशी धावणारी साप्ताहिक विशेष गाडीचा कोरे मार्गावर शुभारंभ झाला. शुक्रवारी दुपारी पनवेलसाठी ही गाडी सोडण्यात आली. एक तासाच्या विश्रांतीनंतर ही गाडी पनवेल येथून पुन्हा रत्नागिरीसाठी निघणार आहे. आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना पूर्णपणे अनारक्षित असलेली ही गाडी फायदेशीर ठरणार आहे.

गाडी क्र. 01133 रत्नागिरी – पनवेल अनारक्षित विशेष (साप्ताहिक) रत्नागिरी येथून 12/05/2023, 19/05/2023 आणि 26/05/2023 रोजी दर शुक्रवारी 13:00 वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी 20.30 वाजता पनवेलला पोहोचेल. गाडी क्र. 01134 पनवेल – रत्नागिरी अनारक्षित विशेष (साप्ताहिक) पनवेल येथून 12/05/2023, 19/05/2023 आणि 26/05/2023 रोजी दर शुक्रवारी 21:30 वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी 04:30 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही गाडी संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा स्थानकावर थांबेल. ही गाडी एकूण 22 डब्यांची असेल. यात सामान्य दर्जाचे 20 कोच तर SLR – 02 असे डबे या या गाडीला जोडले जाणार आहेत.