आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक

रत्नागिरी:- मराठा आरक्षण हे हक्काचे असून ते मिळविण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले. सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली मात्र दुपारी बारा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी न आल्याने मराठा आंदोलकांनी आक्रमक रूप घेतले होते. अखेर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या प्रशासनासमोर ठेवण्यात आल्या.

आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटला आहे. राज्यात मोठा लढा उभारण्याचा निर्धार समाजाने केला आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी सकाळी तालुक्यातील सकल मराठा समाज आंदोलन छेडण्यात आले. मोठया संख्येने आंदोलक एकवटले होते. मात्र जिल्हाधिकारी याना यायला उशीर झाल्याने मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जमलेले आंदोलक आक्रमक झाले. दुपारी बारा वाजता समाजाच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.