आयशर- दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यामधील सालदुरे येथे आयशर व दुचाकी यांच्या अपघातामध्ये महबूब बाबामिया नालबंद या ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना २३ जानेवारी रोजी घडली.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जानेवारी रोजी मेहबूब नालबंद हे सकाळी १० वाजता खेड वरून हर्णे येथे बैलाच्या पायाला नाल मारण्याकरिता मोटार सायकलने जात होते. (गाडी क्रमांक एम एच शून्य आठ ए एफ ७०६७) पॅशन कंपनीची दुचाकी घेऊन हर्णे येथे जात असताना कवीजय लॉजिंग सालदुरे या ठिकाणी सुमारे १२.४५ वाजण्याच्या दरम्यान पोहोचले. त्यावेळेस हर्णे ते दापोलीकडे जाणारे आयशर टेम्पो (गाडी क्रमांक एम एच ०८ ए पी ६१८८) ही समोरून येत होती. मेहबूब नालबंद यांच्या दुचाकीला ठोकर दिली व अपघात घडला. अपघातामध्ये मेहबूब हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तेथील ग्रामस्थांनी खाजगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकायांनी तपासणी करून मेहबूब नालबंद मयत असल्याचे घोषित केले. अपघातग्रस्त झालेला आयशर टेम्पो हा शोएब अहमद शफी मुलानी (वय २७ वर्ष राहणार हर्णे) हा चालवीत असल्याचे मयत महबूब याचा भाऊ मन्सूर नालबंद यांनी दापोली पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. दापोली पोलीस स्थानकात बी एन एस १०६ (१) २८१, १२५(अ) १२५ (ब) मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.