आमदार योगेश कदमांच्या गाडीला धडक देणाऱ्या टँकर चालकाला अटक

खेड:- आमदार योगेश कदम यांच्या गाडीला पाठीमागून धडक देऊन फरार झालेल्या टँकर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. अकलेश नरसिंग यादव (उत्तरप्रदेश) असे ताब्यात घेण्यात आलेल्या टँकर चालकाचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 आमदार योगेश कदम यांच्या गाडीला सहा जानेवारी रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला होता. या अपघातात सुदैवाने आमदार योगेश कदम कुठलीही दुखापत झाली नव्हती. त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाली होती.

 दरम्यान या अपघातात फरार झालेल्या टँकर चालकाचा पोलिस शोध घेत होते. अखेर त्याला ताब्यात घेण्यात पोलिसाना यश आले. गाडीचे ब्रेक न लागल्याने गाडीवरील ताबा सुटला आणि अपघात झाला, अशी त्यानं जबाबात कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.