रत्नागिरी:- कार्तिकी एकादशीनिमित्त जिल्ह्यातून हजारो भाविक दरवर्षी पंढरपूरला जातात. त्यामुळे रत्नागिरी विभागातून सुमारे 125 जादा एसटी गाड्या सोडण्यात येतात. शिवाय काही भाविक दिंडी किंवा वारी घेऊन पायी पंढरपूरला जातात. मात्र येताना एस.टीने परततात. यामुळे एसटीला सुमारे 12 लाखाचे उत्पन्न मिळत होते. यात पुणे विभागाच्या मदतीला पाठविल्या जाणाऱ्या 50 गाड्यांचाही समावेश आहे. यावर्षी कोरोना नाही मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाचा फटका बसला असुन तीन वर्षात एसटीचे 36 लाखांचे उत्पन्न बुडाले आहे.
पंढरपूरला विठु-माऊलीच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. तरुण पिढीची पावले देखील माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपुरला वळू लागली आहेत. मात्र जिल्ह्यात शेतीची कामे सुरू असल्याने आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोजकीच आहे. त्यामुळे या वारीला रत्नागिरी विभागातून जादा गाड्या सुटत नसल्या तरी पुणे विभागाच्या मदतीसाठी दरवर्षी 50 गाड्या पाठविल्या जातात. परंतु कोरोनामुळे मागील दोन वर्षे कोरोनामुळे यात्रा बंद होती. मात्र यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या बंदचा मोठा फटका एसटीला बसला आहे. महामंडळाला जादा गाड्यांमुळे मिळणारे उत्पन्न त्यामुळे थांबले आहे. अन्य जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या अधिक आहे. पुणे विभागाच्या मागणीनुसार दरवर्षी पन्नास गाड्या रत्नागिरी विभागातून पाठविल्या जातात. सलग आठवडाभर गाड्या पंढरपूर मार्गावर धावत असल्याने मिळणारे उत्पन्न महामंडळाच्या खात्यात जमा होते. मात्र मागील दोन वर्षे कोरोना आणि यावर्षी संप याचा मोठा फटका बसला आहे.