आणखी एक डॉक्टर कोरोना बाधित; थिबा पॅलेस परिसरात नव्याने तीन रुग्ण

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचे 17 नवे रुग्ण सापडले आहेत. नव्याने आलेल्या 17 अहवालात रत्नागिरीतील आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. तर शहरातील थिबा पॅलेस परिसरात आणखी तीन रुग्ण सापडले आहेत. 
 

रत्नागिरी तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहेत. गौरी गणपतीसाठी चाकरमानी दाखल झाल्यावर ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 
 

बुधवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार तालुक्यात कोरोनाचे 17 नवे रुग्ण सापडले आहेत. यात नाचणे येथील एक डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय थिबा पॅलेस परिसरात पुन्हा तीन रुग्ण सापडले आहेत. तसेच आठवडा बाजार 1, नाचणे आयटीआय क्वारंटाईन 2, प्रतिभा वसतिगृह 1, कारवांचीवाडी 2, सैतवडे 1, टीआरपी 2, आंबेडकरवाडी 1, आंबेशेत 1, आरोग्य मंदिर 1 आणि गोळप येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.