रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार येथील वृद्धाने रहात्या घरातील हॉलमधील फॅनच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली. जयप्रकाश सिताराम मालगुंडकर (वय ७०, रा. ओंकार रेसिडेन्सी, आठवडा बाजार, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १०) दुपारी दोनच्या सुमारास आठवडा बाजार येथे निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मालगुंडकर यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणातून रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला होता. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.