रत्नागिरी:- दहीहंडीसाठी गोविंदा सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात यावर्षी गोपाळकाल्याच्या दिवशी एकूण 309 सार्वजनिक तर 3043 खासगी दहिहंडया उभारण्यात येणार आहेत. दहीहंडीचा राजकीय फायदा उठवण्यासाठी राजकीय पक्ष देखील सज्ज झाले आहेत.
यंदा ‘दहीहंडीची’ सर्वत्र जोरदार तयारी झालेली आहे. गोविंदापथकेही या उत्सवासाठी सज्ज झालेली आहेत. उद्या गुरूवारी जिल्हाभरात या गोपालकाल्याचा जल्लोष रंगणार आहे. जिल्ह्यात गतवर्षी 2022 मध्ये 251 सार्वजनिक तर 2,339 खासगी दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या, तर आठ ठिकाणी दहीहंडीनिमित्त मिरवणुकां काढण्यात आल्या होत्या. पण गतवर्षीपेक्षा यावर्षीच्या दहिहंड्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे जिल्हा पोलिसांकडे नोंद झालेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
दहीहंडी हा अगदी पुराणकालापासून हिंदू धर्मातील एक पवित्र व पसिध्द सण म्हणून याकडे पाहिले जाते. दही हंडी या कीडा पकारातून युवकांच्या कौशल्याची परिक्षा होते, त्यांचा कस लागतो. या स्पर्धेतून युवकांना, बाळ गोपाळांना एक वेगळा आनंद मिळत असतो. युवकांसाठी, लहान मुलांसाठी हा एक मोठा सणच असतो. असा हा उत्सव उद्या गुरूवार 7 सप्टेंबर रोजी सर्वत्र साजरा होणार आहे.
जिल्हयात उभारण्यात येणाऱया विविध शहरातील सात ते आठ थर असणाऱया हंड्या फोडण्यासाठी जिल्हयातील पथकांसह जिह्याबाहेरची पथकेही येतात. सध्या दहीहंडयांच्या थरांबरोबर ठेवण्यात आलेल्या बक्षिसांच्या किंमतीतही स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे सध्या दहीहंडीला राजकीय स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विविध ठिकाणी राजकीय पक्षांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून हजारों ते लाखों रुपयांची बक्षिसे गोविंदापथकांसाठी व त्या नियोजनावर पैशांचा मोठा चुराडा केला जात आहे. अशा या दहीहंडी उत्सवासाठी रत्नागिरी जिल्हयातील गोविंदा पथक सज्ज झाली झालेली आहेत. सर्वाधिक दहीहंडया जयगड, खेड, दापोली, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, मंडणगड, बाणकोट, दाभोळ येथे फोडण्यात येणार आहेत.