आजाराला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

रत्नागिरी:- बीपी, शुगरच्या आजाराच्या त्रासाला कंटाळून वृद्धाने विहीरीत आत्महत्या केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अरविंद मारुती मयेकर (वय ७०, रा. काळबादेवी, फडजीवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १३) सकाळी पावणेनऊच्या पुर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार अरविंद मयेकर यांना बीपी, शुगरचा त्रास होता. पहाचे साडेचारच्या सुमारास त्यांची पत्नी अमिता ही त्यांना उठविण्यासाठी गेली असता ते घरात दिसून आले नाहीत. त्यानंतर खबर देणार यांना वडिल घरात कुठेही आढळले नाही. त्यांच्या अंथरुणाखाली एक चिठी सापडली त्या लिहीले होते की, आजाराला कंटाळून श्री. ठाकूर यांच्या विहीरीमध्ये जीव देवून आत्महत्या करत आहे. त्यामुळे खबर देणार यांनी आजुबाजूच्या लोकांनी विहीरीमध्ये जावून पाहिले असता अरविंद हे विहिरीत तरंगत असताना दिसले. लोकांनी तात्काळ त्यांना बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.