रत्नागिरी:- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. निवडणुकीच्या कामात अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याने जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असणार्या जिल्हा परिषद भवनात शुकशुकाट पसरला आहे. यामुळे नागरिकांच्याही कामाचा खोळंबा होऊ लागला आहे.
विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतर अनेक शासकीय कार्यालयांतील कर्मचारी व अधिकार्यांची नेमणूक निवडणुकीच्या कामासाठी करण्यात आली आहे. या कालावधीत सर्व शासकीय योजना व विकासकामे बंद असल्याने शासकीय कार्यालयांमधील नागरिक व ठेकेदारांची वर्दळ घटली आहे. जिल्हा परिषदेतही हेच चित्र असून, आचारसंहिता लागल्यापासून सर्वच विभागांत शुकशुकाट आहे.
आचारसंहितेमुळे अधिकारी व कर्मचार्यांवरील कामाचा ताण कमी झाल्याने त्यांच्या चेहर्यावर समाधानाचे वातावरण आहे. मात्र, कार्यालयीन कामकाजातून जराशी विश्रांती मिळते ना मिळते तोच निवडणूक कामासाठी आयोगाने अधिकारी व कर्मचार्यांना ऑर्डर काढल्या आहेत. त्यामुळे या निवडणूक कामासाठी हे कर्मचारी हजर झाले आहेत.
शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये बीएड., डीएड शिक्षक बेरोजगारांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक देण्याचा निर्णय 5 सप्टेंबर रोजीच घेतला. त्यानुसार आदेश काढला गेल व कार्यवाहीही सुरु झाली. पहिल्या टप्प्यात 104 जणांना घेतले सुद्धा मात्र उर्वरीत 500 जणांच्या नियुक्त्या देण्याचे काम सुरु असताना आचारसंहिता लागल्याने ही भरती प्रक्रिया रखडली आहे. आचारसंहिता झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.









