आचारसंहितेमुळे कृषी विभागाचा अडीच कोटींचा निधी अखर्चित राहण्याची भीती

रत्नागिरी:- शासकीय आणि प्रशासकीय कार्यालयात मार्चएंडचा फिवर सुरू असताना आता लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याने कृषी योजना आणि अभियानात अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे मावळत्या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील कृषी योजनांसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या अडीच कोटीचा निधी अखर्चित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अठराव्या लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे कृषी योजनांची प्रगती, खर्चाचा आढावा व फाइलींचा निपटारा करण्याचे काम वेगाने सुरू होते. त्यासाठी प्रशासकीय कार्यालयात मार्चएंडचा फिवर सुरू झाला आहे. गेल्या वेळी लोकसभा निवडणुका एप्रिल व मे 2019 मध्ये झाल्या होत्या. लोकसभेसाठी एप्रिल ते जूनपर्यंत सात टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभे पाठोपाठ विधानसभेसाठी देखील होणार आहेत. त्यामुळे मार्च एंडचा उरक सुरू असताना आता आचारसंहितेत कृषी योजनांसाठी मंजूर झालेला निधी प्रस्तावित कामावर खर्च करावा लागणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मावळत्या आर्थिक वर्षात कृषी यांत्रिकीकरण, मागेल त्याला शेततळे, डॉ. बाबासाहेबकर आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अभियान, खरीपासाठी बियाणे आणि खताचे वितरण थेट शिवारात या अनेक योजनांसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर आहे. मात्र, सरत्या आर्थिक वर्षात निधीला मान्यता देण्यात विलंब झाल्याने आता हा निधी अखर्चित राहण्याची शक्यता आहे. मात्र आचार संहितनेमुळे ही कामे रखडणार असल्याने निधी मंजूर होऊनही वितरणासाठी कृषी विभागासह प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.