रत्नागिरी:- रत्नागिरीतील काही नागरिकांना दोन दिवसांपुर्वी आकाशामध्ये एका रेषेत जाणार्या आणि प्रकाशमान होणार्या वस्तू दिसल्या. त्यामुळे खगोलप्रेमींसह अनेकांची उत्सुकता ताणली गेली. त्या उडत्या तबकड्या आहेत की काय अशी चर्चाही रंगली; मात्र आकाश निरीक्षकांनी त्याचा खुलासा केला असून ते कृत्रीम उपग्रह आहेत. ते सौर स्थिर उपग्रह प्रकारातील असून सुर्यास्तानंतर सुर्यकिरणेंच्या पृष्ठभागावर पडल्यामुळे उपग्रह प्रकाशमान होत आहेत.
रत्नागिरीमध्ये 18 ते 22 डिसेंबर या कालावधीत एका सरळ रेषेत वरच्या दिशेने जाणार्या आणि प्रकाशमान होणार्या वस्तु दिसल्याचा दावा नागरिकांनी केला. काहींनी त्याचे व्हिडीओ आणि फोटोही काढले. त्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे खगोल प्रेमींसह अनेकांची उत्सुकता ताणली गेली. रत्नागिरी शहर आणि संगमेश्वर तालुक्यातील काही ठिकाणांहून असा अनुभव काहींनी घेतला आहे. ही गोष्ट परग्रहावरील तबकडी किंवा युएफओ तर नाही ना? असाही प्रश्न उपस्थित केला गेला. आकाशात दिसलेली वस्तु ही परग्रहावरील तबकडी किंवा युएफओ नसल्याचे जाणकारांचं म्हणणं आहे. याबाबत आकाश निरीक्षक श्रीवल्लभ साठे म्हणाले, रत्नागिरी परिसरात आकाशात अद्भूत नजारा पाहिला. चांदण्यांची साखळी काही काळापूर्ती प्रकाशमान झाली होती. ती कोणताही परग्रहावरुन आलेली तबकडी किंवा युएफो नव्हती. एलन मस्क यांच्या स्पेस एक्स या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत स्टार लाईन सेटलाईन ट्रेन हा प्रकल्प राबविला जात आहे. त्या प्रकल्पाशी निगडीत तो एक भाग होता. एका ओळीत समान अंतरावर प्रकाशमान झालेल्या चांदण्या म्हणजे ते कृत्रीम उपग्रह आहेत. ते सौर स्थिर उपग्रह प्रकारातील असून सुर्यकिरण त्यांच्या पृष्ठभागावर पडल्यामुळे प्रकाशमान झाले होते. सुर्यास्तानंतर ठरावीक वेळेत ते दिसले. ते लिओ या प्रकारचे (लो अर्थ ऑर्बीड ऑब्जेक्ट) म्हणजेच पृथ्वीपासून खुुप कमी अंतरावर असलेल्या कक्षा स्थिरावलेले आहेत. त्यामुळे ते अधिक प्रकाशमान झालेे दिसलेले. याबाबत अधिक अभ्यास केल्यावर लक्षात आले की, साठ उपग्रह एकमेकांबरोबर जोडलेले आहेत. त्यांची साखळीच कार्यरत आहे. ते दोन दिवस आधी काश्मिर, उत्तर भारतातून दिसले. तर रत्नागिरी दिसल्यानंतर दोन दिवसांनी मंगेलोर, उडपीतही पाहिली गेले. ते पृथ्वीभोवती वेगवेगळया पध्ततीने फिरत आहेत. बाकीचे गैरसमज पसरवण्याच्यादृष्टीने नाहीत.









