रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करत मागे बसलेल्या आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक मुलाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताची ही घटना दि. ९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वा. माळनाका ते देसाई हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर सन्मित्रनगर येथील सद्गुरू वडापाव गाडी समोर घडली होती. याप्रकरणी शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशन मनोज तळेकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालक मुलाचे नाव आहे. या अपघातात त्याची आई मेघना मनोज तळेकर यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पोलिस हेड कांस्टेबल प्रविण पाटील यांनी तक्रार दिली होती.
त्यानुसार, दि. ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तो आपल्या ताब्यातील दुचाकी वरुन आई मेघना तळेकर यांना बँकेच्या कामासाठी घेऊन जात होता. तो बेदरकारपणे मयदिपेक्षा जास्त वेगाने दुचाकी घेउन जात असताना तोल गेल्याने त्याची आई रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याच रात्री तिचा मृत्यू झाला होता.









