आंबा फवारणीचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- मद्याच्या नशेत आंबा फवारणीचे विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महेश बळीराम ठिक (वय ३५, रा. वांद्री, ता. संगमेश्वर) असे आंबा फवारणीचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ३) सकाळी सातच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेश ठिक यांना मद्याच्या नशेत बुधवारी (ता. १) रात्री आठच्या सुमारास आंबा फवारणीचे औषध प्राशन केले होते. तात्काळ नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना आज सकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस अमंलदार करत आहेत.