आंबा घाटात ‘त्या’ तरुणाचा मित्रानेच केला खून

मैत्रीसाठी दारू ठरली कर्दनकाळ; रागाच्या भरात कारची ठोकर दिल्याने मृत्यू

देवरुख:- आंबा घाटात जखमी अवस्थेत सापडून मृत झालेल्या सातारा जिल्ह्यातील सुधीर अर्जुन यादव या तरुणाचा मित्र आशिष शांताराम भावके याने खून केल्याचे पोलीस ता तपासात उघड झाले आहे. आशिष याला अटक करून सोमवारी देवरुख न न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायाधीशांनी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पाटण तालुक्यातील साईकडे येथील रहिवासी सुधीर अर्जुन यादव हा कराड येथील मित्र आशिष शांताराम भावके याच्या समवेत सात दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे फिरायला आला होता. व त्यानंतर महामार्ग पोलिसांना सुधीर आंबा घाटात महामार्गानजीक जखमीअवस्थेत आढळला आला होता. त्याला तात्काळ उपचारासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे सुधीर याचा मृत्यू झाला.

सुधीरच्या हातापायाला दुखापत असल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सोमवारी अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीयपोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी आंबा घाटात घटनास्थळी भेट दिली. तपासा दरम्यान आशिष भावके याची सुधीर यादव मृत कसून चौकशी करण्यात आली. चौकशीअंती यातील तथ्य बाहेर आले आहे.

सुधीर यादव व आशिष भावके या दोघांनीही मद्यप्राशन केले होते. गायमुखापासून वरील बाजूस कार पोहोचल्यानंतर सुधीर यादव याने मला अजून दारू प्यायची असल्याचे आशिषला सांगितले. यावर आशिष याने पुढे जाऊन पिऊया असे सांगितले. याचा राग आल्याने सुधीर गाडीच्याबोनेटवर चढला व उड्या मारू लागला व त्यानंतर त्याने रागाच्या भरात समोरील काच देखील फोडली. याचा राग आशिषला आल्याने त्याने गाडी सुरू करून सुधीरला जोरदार ठोकर दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या धडकेमुळेच सुधीरचा मृत्यू झाला. आशिषने याची कबुली दिली आहे.

सुधीरचा खून केल्याप्रकरणी आशिष याच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला सोमवारी अटक करून देवरुख न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुधीर व आशिष यांची अनेक वर्षांची घट्ट मैत्री होती. मात्र या मैत्रीचा दारूनेच अखेर घात केला.