आंबा घाटात एसटीची डंपरला धडक; एसटी चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबा घाट दख्खीण-बौद्धवाडी (ता. संगमेश्वर) येथे एसटीने डंपरला मागून धडक दिली. या अपघातामध्ये गाडीचे नुकसान झाले. देवरुख पोलिस ठाण्यात संशयित एसटी चालकाविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अझरोद्दीन मेहबुब शेख (वय ३९, रा. आझाद गल्ली, कालकुंद्री, ता. चंदगड. जि. कोल्हापूर) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १९) सकाळी साडेदहाच्या सुमारास कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबा घाट दख्खीण बौद्धवाडी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित अझरोद्दीन शेख हे एसटी चालक बस (क्र. एमएच-१४ बीटी २७२२) घेऊन जात असताना दख्खीण-बौद्धवाडी रस्त्यावर बस निष्काळजीपणे चालवून समोर थांबलेल्या डंबर (क्र. एमएच-१० डीटी ७९९१) ला पाठीमागून ठोकर देऊन अपघात केला. यामध्ये गाडीचे नुकसान झाले. या प्रकरणी फिर्यादी सोनू हल्लुलाल बर्मन (वय १९, रा. देवळे, ता. संगमेश्वर-रत्नागिरी मुळ ःमुडियामदौद ता. मंझोली, जि. जबलपुर, मध्यप्रदेश) यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास देवरुख पोलिस अमंलदार करत आहेत.