आंदोलकांनीही पोलीसांप्रमाणेच तुकड्या तयार करुन पोलीसांना टक्कर देण्याचे केले नियोजन

आंदोलकांचे हे किस्से पोलीसांच्या कॅमेर्‍यात कैद

रत्नागिरी:- बारसू – सोलगाव येथील ग्रीन रिफायनरी विरोधामुळे चर्चेत आली आहे. आक्रमक आंदोलकांनी प्रकल्प स्थळी जाण्याचा प्रयत्न केला. याच वेळी पोलीसांनी त्यांना रोखण्यासाठी लाठीचार्ज केल्याचा आरोप होऊ लागला आहे. पोलीसांवर सर्व स्तरावरून टिका होत असताना आता आंदोलकांचेही किस्से बाहेर येवू लागले आहेत. पोलीसांच्या बदोबस्ताला टक्कर देण्यासाठी आंदोलकांनीही प्लॅन केला होता. तर आंदोलना दरम्यान उपविभागिय पोलीस अधिकारी निता पाडवी यांच्यासह सहा महिला पोलीस कर्मचारी यावेळी जखमी झाले आहेत. मात्र आंदोलकांनीही पोलीसांप्रमाणेच तुकड्या तयार करुन पोलीसांना टक्कर देण्याचे नियोजन केले होते. तर आंदोलकांचे हे किस्से पोलीसांच्या कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.

शुक्रवारी दुपारी बारसू येथील आक्रमक झालेल्या आंदोलकांनी माती परिक्षण सुरु असलेल्या ठिकाणी धाव घेतली. तो पर्यंत शांत असलेल्या पोलीसांना मात्र यावेळी ॲक्शन मोडमध्ये यावे लागेल. आंदोलनात महिलांचा समावेश जास्त होता. याचा अंदाज पोलीसांना आगोदरच आल्याने त्यांनीही माहिला पोलीसांची कुमक अधिक आणली होती.

आंदोलक महिलांना ताब्यात घ्यायला गेल्यानंतर त्या जागी जाग्यावर कोसळत होत्या. त्यांना झाडाच्या सावलीत घेवून जाणार्या महिला पोलिसांनाही त्या विरोध करत होत्या. त्यामुळे महिला पोलीसांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. माळरानावर ज्याप्रमाणे महिला आंदोलक रणरणत्या उन्हात उभ्या होत्या. त्याच्या सोबत महिला पोलीसाही उन्हामध्ये उभ्या होत्या. कर्तव्य बजावत असताना त्यांनाही उन्हाचे चटके सहन करावे लागतच होते.

अणूउर्जा त्यानंतर नाणार येथील आंदोलनाच्या अनुभवावरुन पोलीसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले होते. आंदोलक महिलांची संख्या अधिक असू शकेल या शक्यतेने माहिला पोलीस कुमक मोठ्याप्रमाणात मागविण्यात आली होतीच. एक पोलीस अधीक्षक, दोन अप्पर पोलीस अधीक्षक, डिवायएसपी , पोलीस निरिक्षक व कर्मचारी यांचा तगडा बंदोबस्त असतानाही आंदोलकांनी लढविलेल्या क्लुपत्याचे किस्से आता बाहेर येवू लागले आहेत.

ग्रामस्थांशी संवाद साधणार:धनंजय कुलकर्णी
बारसू परिसरातील प्रत्येक गावात जावून पोलीस दलामार्फत त्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. यासाठी मी स्वत: जाणर असल्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. आक्रमक आंदोलन करुन त्यातून काहिही निष्पन्न होणार नाही. चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. येथील जनता गरिब आहे. त्यांना समजावून सांगणे आमचे काम आहे. ते आम्ही करु. त्यामध्ये आम्हाला यश येईल असा विश्वास पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला.