दापोली:- तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर नव्याने सुरु झालेल्या बीच ऍक्टिवीटीमुळे समुद्रात पोहायला गेलेल्या पर्यटकाचे प्राण वाचले आहेत. रविवार दिनांक १६ मार्च रोजी पहाटे समुद्रात काही पर्यटक पोहायला गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने एक पर्यटक बुडू लागला होता.
सोबतच्या पर्यटकानी समुद्रालगत असलेल्या मकरंद महादलेकर यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी त्वरीत माजी सरपंच संदेश देवकर यांना फोन करून ही माहिती दिली. संदेश देवकर हे मुंबईत असून देखील त्यांनी तत्काळ बाळा केळसकर यांना संपर्क केला आणि एका क्षणाचाही विलंब न करता सोबतच्या सहकाऱ्यांना घेऊन बुडणाऱ्या पर्यटकाचे प्राण वाचवण्यात आले.
सूरज रहाटवळ व त्यांच्या सहकार्यानी तत्परता दाखवत हे साहसी काम केले. समुद्रकिनारी समुद्र दर्शनासाठी हजर असलेल्या बोटीमुळेच हे शक्य झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मदत करणाऱ्या सर्वांचे आभार याबाबत कौतुक केले जात आहे.