रत्नागिरी:- अस्तरीकरणाशिवाय शेततळ्यासाठी 75 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यापूर्वी शेततळ्याचा लाभ न घेतलेल्या जिल्ह्यातील शेतकर्यांनी राज्य शासनाच्या महाडिबिटी संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नोंद करून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतंर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
भविष्यात फळबाग वाचविण्यासाठी सध्या उपलब्ध विहीर व बोअरवेलचे, पावसाद्वारे उपलब्ध होणारे पाणी अस्तरीकरणासह शेततळे योजनेचा लाभ घेऊन वाचविणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकर्याचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. यापूर्वी शेततळ्याचा लाभ न घेतलेल्या जिल्ह्यातील शेतकर्यांनी राज्य शासनाच्या महाडिबिटी संकंतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने संपर्क साधावा त्यानुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतंर्गत वैयक्तिक शेततळे योजनेत सहभागी होता येणार आहे. अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधाण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.









