संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे येथे रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेतून पडल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला.बुधवारी सकाळी कोकण रेल्वेचा ट्रॅक मेन कर्मचारी हा धामणी ते उक्षी असा गस्त घालत असताना मौजे असुर्डे बोगद्याच्या आलीकडे रेल्वे रुळावर छीन्न-विछीन्न अवस्थेत रेल्वे रुळावर मृतदेहाच्या शरीराचे काही अंतरा पर्यंत रेल्वे रुळावर तुकडे तुकडे दिसून आले .याची माहिती रेल्वेचे कनिष्ठ अभियंता डी. के. जाधव यांनी संगमेश्वर पोलिसांना दिली.
बुधवारी सकाळी धामणी -ते उक्षी रेल्वे रुळावर गस्त घालत असताना मौजे असुर्डे या ठिकाणी 176/3 रेल्वे रुळाच्या ठिकाणी एका पुरुष व्यक्तीचा रेल्वे रुळावर काही अंतरापर्यंत छीन्न -विछीन्न अवस्थेत मृतदेहाचे तुकडे ट्रॅकमेनला दिसून आले.
यावेळी याची माहिती त्याने संगमेश्वर रेल्वे रोड स्टेशन सबंधिताना दिली. त्या प्रमाणे येथील रेल्वेचे अभियंता डी. के. जाधव यांनी संगमेश्वर पोलिसांना माहिती कळवताच संगमेश्वर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमित यादव,पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे,सहाय्य्क पोलिस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे, पोलिस कॉन्सटेबल रामपुरे, पोलिस कॉन्सटेबल सोमनाथ अव्हाड, पोलिस कॉन्स्टेबल म्हस्कर, पोलिस कॉन्स्टेबल पाईकराव यांनी घटनास्थळी जाऊन जाऊन पंचनामा करून मृतदेहाचे अवशेष एकत्रित गोळा करून संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेले.या वेळी पोलिस पाटील सुभाष गुरव हेही उपस्थित होते.
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मृत व्यक्ती हा 11100 मडगाव Ltt रेल्वेने प्रवास होता. त्याच रेल्वे बोगीत त्याची बॅग मिळाली असून त्या बॅगेत मिळालेल्या आधारकार्ड वरून मृत व्यक्तीचे नाव गिरेन अजित राजभोंशी वय वर्ष 34 असून आसाम राज्यातील गोरेश्वर येथील असल्याचे आधारकार्ड वरून त्याची ओळख पटली असून तो रेल्वेच्या ज्या बोगीतून प्रवास करत होता त्या बोगीतून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांकडून पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार गिरेन हा मद्यधुंद अवस्थेत होता. तसेच त्याने धावत्या रेल्वेतून उडी घेतली.
दरम्यान घटनेची माहिती संगमेश्वर पोलिसांकडून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना आसाम पोलिसा मार्फत पोहचवण्यात आली असून अधिक तपास संगमेश्वर पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे करत आहेत.









