ना. उदय सामंत यांच्या सूचना, फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार
रत्नागिरी:- गणेशोत्सवाच्या काळामध्ये खासगी बस ट्रॅव्हल्सधारकांकडुन प्रवाशांची लुट होते. एसटी भाड्याच्या दीडपट जादा तिकिट आकरण्यास त्यांना परवानगी आहे. मात्र हंगाम लक्षात घेऊन आव्वाच्या सव्वा भाडे आकारणार्या खासगी ट्रॅव्हल्सधारकांवर आटीओ आणि पोलिसांमार्फत करडी नजर राहणार आहे. प्रवाशांची लुट केली जात असले तर फसवणुक आणि मुंबई मोटार अॅक्टप्रमाणे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, कोकणात गणेशोत्सवासाठी येणार्या चाकरमाण्यांना 10 दिवसाचा क्वारंटाईन कालावधि केली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडुन ग्रामपंचायत आणि ग्राम कृती दलांना पत्र दिले जाणार आहे. तसे पुणे, कोल्हापुर मार्गे रत्नागिरीत येणार्या चाकरमन्यांना टोल फ्रि करावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येणार्या चाकरमान्यांची क्वारंटाईन साठी सुविधा करण्यात आली आहे. तेथे आयुर्वेदीक डॉकट, खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत असल्याने खासगी 27 डॉक्टरांची मदतीसाठी यादी तयार केली आहे. त्यांच्याची चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
जिल्हा कोविड रुग्णालयावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. तो विश्वास वाढविण्यासाठी मी आरोग्या विभागाच्या कर्मचार्यांशी चर्चा करणार आहे. तसेच सिंधुदुर्ग पॅटर्न वापरण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. म्हणून तेथली जिल्हा शल्य चिकित्सक, पोलिस अधीक्षक, आरोग्य अधिकारी, कोविडमध्ये काम करणारे अधिकारी यांच्याशी चर्चा करून काही धोरण निश्चित केले जाणार आहे. कोविड रुग्णालया योग्य उपाचर आणि सेवा दिली जाऊन रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न केला जातो, हे पटवुन देण्याचा प्रयत्न करू, असेही सामंत यांनी सांगितले.
सिव्हिलबाबत गैरसमज पसरविणार्यांची चौकशी
जिल्हा शासकीय रुग्णालयाबाबत लोकांमध्ये गैरसमज पसरविला जात आहे. चुकीची माहिती देणारी यंत्रणा रुग्णालयात कार्यरत आहे. त्याची चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस यंत्रणेला दिल्या आहेत, असे सामंत यांनी सांगितले.