रत्नागिरी:- जिल्हयात बेकायदेशीर गावठी दारू आणि गोवा बनावटीची चोरटी दारू विकली जात आहे. अवैधरित्या मद्य विक्री करणार्यांवर कारवाई करा अशी मागणी रत्नागिरी जिल्हा देशी मद्य विक्रेता संघाने उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्हाधिकार्यांकडे केली आहे, अशी माहिती अध्यक्ष राजीव कीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेला विजय खेडेकर, रोहन देवकर, रविंद्र सुर्वे, अनिश भाटकर, मंगेश मोरे, पी.बी.नागवेकर, सुहास भोसले, प्रकाश लब्धे, स्वप्नील आंबोळकर, दर्शन पाटील, संजय मयेकर ,रविंद्र चव्हाण, दिपाली निकम, रत्नाकर सुर्वे आदी उपस्थित होते. श्री. कीर म्हणाले, गोवा बनावटीच्या दारु विक्रिचा सुळसुळाट सुरु आहे. त्यामुळे सरकारच्या महसुलात घट होत आहे. त्यामुळे पोलिस खाते व राज्य उत्पादन शुल्क खाते यांचे माफत संयुक्त मोहिम राबवून ज्या ठिकाणी गावठी दारू निा।मती होते व विक्री केली जाते. त्या जागेच्या सातबारा असलेल्या मालकावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. बेकायदेशीर दारू विक्रीच्या ठिकाणी सकाळी उत्पादन शुल्क खात्याच्या शिपाई व संध्याकाळी पोलिस खात्याचा शिपाई गणवेशात बंदोबस्तासाठी ठेवल्यास महिन्याभरातच हे अनधिकृत धंदे बंद होतील. गुन्हा दाखल होण्याच्या भितीने बेकायदेशीर दारु पिण्यास ग्राहक जायचे बंद हाईल.









