जिल्ह्याचा पाणी टंचाईचा आराखडा रखडला
रत्नागिरी:- नऊपैकी चारच तालुक्यांनी पाणीटंचाई आराखडा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे सादर केलेला आहे. त्यामुळे उर्वरित पाच तालुक्यांचा आराखडा येईपर्यंत जिल्ह्याचा आराखडा बनविण्यास विलंब होणार आहे.
यंदा पावसाने लवकर विश्रांती घेतल्यामुळे टंचाईची तिव्रता अधिक भासण्याच्या शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याची पुर्वतयारी म्हणून जिल्हा परिषद कृषी विभागाकडून लोकसहभागामधून बंधारे उभारण्यास सुरवात केली आहे. गावागावात ही मोहिम सुरु आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे जिल्ह्याचा टंचाई आराखडा बनविण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. तालुक्यामधून टंचाईसाठीच्या उपाययोजनांची माहिती मागविली जाते. तालुक्याचा आराखडा आमदारांच्या उपस्थितीत होणार्या बैठकीत मंजूर केला जातो. नऊ पैकी राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि गुहागर या चार तालुक्यांनी जिल्हापरिषदेकडे टंचाई आराखडे सादर केलेले आहेत. उर्वरित पाच तालुक्यांनी अजुनपर्यंत आराखडेच दिलेले नाहीत. त्या तालुक्यातील आमदारांच्या उपस्थितीत बैठकाही झालेल्या आहेत. अंतिम सह्या घेऊन तालुक्यातील स्थिती जिल्हापरिषदेला कळविणे आवश्यक आहे. तो आराखडा तयार करून जिल्हाप्रशासनाकडे सादर केला जातो. तिथून राज्य शासनाकडे निधी मंजूरीसाठी पाठविण्यात येतो. यामध्ये पाणीयोजना दुरुस्ती, टँकर, विंधनविहिरी खोदाई, विहिरी अधिग्रहीत करण्यासाठी निधी तरतूद केली जाते. हा आराखडा 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सुचना जिल्हाप्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. ही डेडलाईन टळून गेली आहे. दरवर्षी मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात टँकर धावतो. त्यापुर्वी पाणीटंचाई जाणवू नये यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आराखडा मंजूर झाला पाहीजे. तसेच लोकसभा निवडणुका लक्षात घेता टंचाई आराखडा लवकरात लवकर तयार होणे आवश्यक आहे. दरम्यान, पहिला जलजीवन योजनेमुळे टंचाई आराखडा अकरा कोटीवरून पाच कोटीवर आलेला आहे. यंदा त्यामध्येही घट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जानेवारी महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण याचा परिणाम हापूस आंब्यावर दिसू लागला आहे. सध्या मोहर व फळधारणेवर थ्रीप्स, तुडतुडा आणि अँथ्रक्सनोजमुळे परिणाम झालेला आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फवारणी केली जात आहे. किटकनाशकांचे दर अधिक असल्यामुळे शेतकर्यांच्या अतिरिक्त खर्चात वाढ झाली आहे.
या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने ‘ऑक्टोबर हीट’ चांगलीच जाणवली. नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू होताच आंब्याला मोहर सुरू झाला. अवकाळी पावसामुळे मोहोरावर परिणाम झाला. काही ठिकाणी मोहर खराब झाला. दुसर्या व तिसर्या टप्प्यात मोहर मात्र टिकून आहे. पहिल्या मोहराचा आंबा पाच ते दहा टक्केच शिल्लक राहिला आहे. दुसर्या व तिसर्या टप्प्यात सर्वत्र मोहर चांगला आला आहे. काही ठिकाणी फळधारणा अद्याप व्हायची आहे तर काही ठिकाणी कणी तर काही ठिकाणी सुपारी एवढा आंबा झाडावर आहे. हा आंबा मार्चमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे.
दोनच आठवड्यांपूर्वी आंब्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, बागायतदारांनी योग्य उपाययोजना केल्याने तुडतुडा आटोक्यात आणण्यात यश आले होते; परंतु तुडतुड्याचा प्रादुर्भाव वारंवार होत असल्याने शेतकर्यांना आटोक्यात आणणे अवघड बनले आहे. प्रत्येक फवारणीत 20 ते 25 दिवसांचा फरक असणे आवश्यक आहे. मात्र, कीटकनाशकांचा प्रभाव पडत नसल्याने 10 ते 15 दिवसाने फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे. पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य कीडरोगाचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे बागायतदारांसाठी आंबा पीकावरील खर्च वाढला आहे









