अल्पवयीन विद्यार्थ्यांला मोटारीची धडक; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या पाठीमागील मैदानातून शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याला मोटारीने ठोकर दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात संशयित मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. ९) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन विद्यार्थी हा सकाळी पटवर्धन हायस्कूलच्या पाठीमागील मैदानातून शाळेत जात असताना अचानक अज्ञात मोटार चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवुन विद्यार्थ्याली धडक दिली. या अपघातात अल्पवयीन विद्यार्थ्याच्या पायावरुन मोटारीचे चाक गेले. या अपघातात अल्पवयीन विद्यार्थी गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मंजिरी संदेश कडव (वय ३५, रा. सह्याद्रीनगर, नाचणे-रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.