अलिबाबा, चाळीस चोरांची गुहा पोखरून शिवसेनेचा भगवा फडकविणार: खा. राऊत

रत्नागिरी:- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकटे पाडण्याचा कुटील डावा भाजप आणि गद्दार ४० आमदारांनी टाकला आहे. या अलिबाबा,  ४० चोरांची गुहा पोखरून एकट्या शिवसेनेचा भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री पदाची तातपुर्ती हाव भागवली आहे. आमचे नव्हते, ते गेले, आहेत ते नव्या उमेदीने उभा राहिले आहेत. पण आपले पाप लपविण्यासाठी ठाकरेंच्या भोवती असलेल्या कोंडाळा आणि संजय राऊत यांच्यावर खापर फोडणे योग्य नाही. शिवसेनेला महाराष्ट्रातून निष्ठावंतांची  ताकद मिळात आहे. हिम्मत असले तर भाजपने महाष्ट्रात मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवाव्या, असे आव्हान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिले.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रमुख विलास चाळके, जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक, रत्नागिरी तालुका प्रमुख बंड्या साळवी, प्रमोद शेरे आदी उपस्थित होते. ते म्हणाले, भाजपच्या घानेरड्या राजकारणानंतर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर सेनेच्या आमदारांनी खरेदी विक्री दुकानात विक्री करून घेतली. किती घोडेबाजार झाला हे सर्वांना माहित आहे.  त्या आमिषाला काही आमदार बळी पडले तर जिल्ह्यातील दोन मंत्री पदे असूनही ते देखील बळी पडले. पण आम्हाला आता चिंता नाही, आमचे नव्हे ते गेले. जे होते ते नव्या उमेदेने उभा राहिले आहे.  भाजपचा कुटील डाव टाकला आहे. त्यांना मुख्यमंत्रपद पाहिजे होते, त्यांची तात्पुर्ते हाऊस भागवली आहे. आजही शिवसेनेच विधिमंडळ पक्षाचे नुकसान पण शिवसेनेचा मुळ ढाचा, पाया ढासळलेला नाही. सर्व पदाधिकारी आजही तेवढ्याच ताकदीने उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीर उभे आहे. काही
झाले, तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात एकट्या सेनेचा भगवा फडकविण्याचा प्रयत्न करणार.

भाजपने संपूर्ण देशाची घटनेचा चोळामोळा करण्याचे पाप चालवले आहे. त्याला अनुसरून उद्धव ठाकरे यांनी घटना तज्ज्ञांना आवाहन केले आहे. या राजकीय परिस्थितीवर उघड उघड भाष्य करा. आदरनिय उल्लाह बापट त्यांनी परखड मत मांडले. भाजपचे  कुटील आणि कपटी राजकार घटनेचे उल्लंघन होत आहे. भाजपने हिम्मत असले तर महाष्ट्रात मध्यवर्ती निवडणुका घ्या, असे राज्याची अस्थिर सरकर करण्याचे आणि गतिमान शासनाला रोखण्याचा काम त्यांनी केले. घोडेबाजारामध्ये किती हजार कोटीची उधळपट्टी केली हे सर्वांना माहित आहे. तीन, चार की पाच हजार कोटी. पैशाचा वारेमाप वापर करून सेना संपविण्याचा विचार आहे.  मात्र तो तो विचार फोल ठरला आहे. शिवसैनिक विकला जाणार नाही. तुम्हाला गाडुन टाकतील, धडा शिकवतील, असा इशाराही विनायक राऊत यांनी दिला.