Sunday, May 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मकोका लावणार

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मकोका लावणार

नुतन पोलीस अधीक्षकांचा इशारा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सोमवारी रत्नागिरीतील पत्रकारांशी सुसंवाद साधला. आपल्या कार्यकाळात कायदा व सुवस्थेबाबत रत्नागिरीकरांनी निश्चिंत रहाव़े तसेच कोकणात अमली पदार्थांची तस्कारी फोफावत आहे. हा प्रकार मोडीत काढणे हे माझे प्राधान्य असणार आहे. अमली पदार्थांची तस्कारी करणाऱ्यांवर मकोका कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा बगाटे यांनी दिला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथील मंथन सभागृहात ते बोलत होत़े बगाटे यांनी सांगितले की, यापूर्वी आपण सिंधुदुर्ग येथे काम केले असल्याने त्यावेळच्या आठवणी कायमच माझ्या स्मरणात आहेत. कोकण हे एकप्रकारे माझं दुसरं घर आहे. कोकणात येण्याची माझी तीव्र इच्छा होती. अखेर याठिकाणी बदली झाल्याने मला अतिशय आंनद झाला असल्याचे बगाटे यांनी सांगितले.

सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती होणे गरजेचे
अलीकडे सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते, यावर बोलताना बगाटे म्हणाले की, सायबर गुह्यांबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. आपला पैसा जावू नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, आपले डिटेल्स कुणालाही देवू नये. सायबर गुन्हेगारी करणारे अनेक ठिकाणी विखुरलेले असतात अशा वेळी त्यांच्यापर्यंत पोहचणे पोलिसांना जिकरीचे असते. पण आपण हाती घेतलेला विषय मार्गी लावण्यात विश्वास ठेवत़ा त्यामुळे याबाबतील देखील रिझल्ट देवू असे बगाटे यांनी सांगितले.

समुद्र किनाऱ्यावरील लँडिंग पॉईंटना सुरक्षा देणार
कोकण किनारपट्टीवर सागरी सुरक्षा हा अत्यंत महत्वाचा विषय आह़े शत्रु समुद्रमार्गी येण्याची शक्यता आहे. नुकतेच भारत-पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर कोकण किनारपट्टी अतिशय संवेदनशील मानली गेली होती. मच्छीमार बांधवांची सुरक्षा राखणे आमचे कर्तव्य आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या लँडिंग पॉईंवर (होडी किनारी लागण्याच्या जागा) विशेष सुरक्षा ठेवण्यात येणार आहे.

कर्णकर्कश सायलेन्सरवर कारवाई करणार
छत्रपती संभाजी नगर येथे आपल्या कार्यकाळात कर्णकर्कश सायलेन्सर बसविण्याऱयावर कारवाई करण्यात आली होत़ी आपण इंजिनिअर असल्याने सायलेन्सरचा वापर करुन एक स्मारक उभारले होत़े जेणेकरुन अशा प्रकारेचे सायलेन्सर बसविणाऱयांना जरब बसल़े त्यामुळे आपले आवाहन आहे की, ज्यांनी मोठय़ा आवाजाचे सायलेन्सर बसविले आहेत त्यांनी स्वतहून ते काढून टाकावेत अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल़
गोवा बनावटीची मद्य वाहतूक रोखण्यासाठी सीमेवर लक्ष ठेवणार

कोकणातून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतुक होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. यासाठी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सिमांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोकणातील तरुण कामानिमित्त मुंबई-पुण्यात असल्याने वृद्ध एकटेच वास्तव्य करताना दिसुन येतात. त्याच्या सुरक्षेवरही लक्ष दिले जाईल असे बगाटे यांनी सांगितले.