अपघात की घातपात… तरुणीच्या मृत्यूचे गूढ वाढले

रत्नागिरी:-भगवती बंदर येथून दोनशे फूट खोल खाली पडलेल्या दिक्षा मोहन इंगोले या तरुणीच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. कॉलेजला जाते सांगून बाहेर पडलेली दिक्षा भगवतीबंदर येथे कशी पोहचली. घरात काही भांडण झाले नसताना आत्महत्या करण्याचा प्रश्नच नाही. मग अशावेळी तिचा अपघात झाला की घातपात याचा शोध आता पोलीस घेत आहेत. 

शहरा नजिकच्या भगवती किल्ल्यानजिक सुमारे दोनशे फूट खोल कठड्यारून पडल्याने २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. दिक्षा आत्महत्या केली, की घसरुन पडली, की तिला ढकलण्यात आले असे अनेक प्रश्न निर्माण झाले. दोनशे फुट उंचावरुन  खडकाळ जागेत पडल्याने तिचे डोके पुर्णतः फुटले. तर एक पाय तुटला होता. रक्तबंबाळ अवस्थेत ती एका खडकावर पडलेली सापडली. तिच्या सोबत मोबाईल व अन्य कोणत्याहि वस्तू नसल्याने ती तेथे पोहोचली कशी असे अनेक प्रश्न निर्माण झाले.
 

दरम्यान मृत दिक्षा मूळची महाड येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील तीन वर्षे नवनिर्माण काॅलेज रत्नागिरी येथे शिक्षण घेत होती. सोमवारी नेहमीप्रमाणे दिक्षा कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडली मात्र कॉलेजला न जाता ती भगवतीबंदर येथे कोणासोबत गेली? तिने आत्महत्या केली की तिचा पाय घसरून ती पडली का तिचा घातपात झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.