अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- बेदरकारपणे गाडी चालवून कठड्याला धडक देत अपघात केला. यात गाडीमधील पत्नीच्या दुखपतीस तसेच सासूच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकारणी प्रौढाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 1 वा. सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या कठड्याजवळ घडली होती.

सुरेश सदानंद गांधी (50,रा.मारुती आळी, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रौढाचे नाव आहे. या अपघातात त्याची सासू शालिनी प्रभाकर बेर्डे (76, रा.शाहूपुरी कोल्हापूर ) यांचा मृत्यू झाला. तर पत्नी शमिका सुरेश गांधी (रा.मारुती आळी, रत्नागिरी ) या जखमी झाल्या.शुक्रवारी सुरेश गांधी आपल्या ताब्यातील इको गाडी (एमएच-08 -व्हि- 9100) मधून पत्नी व सासूला घेऊन कोल्हापूर ते रत्नागिरी असा येत होता. तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या कठड्याजवळ आला असता त्याचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले करत आहेत.