अनोळखी मनोरुग्ण वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- मनोरुग्णालयातील अनोळखी वृद्ध महिलेला दम लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. ६) सायंकाळी पाचच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनोरुग्णालयात ७८ वर्षाची बट्टो अनोळखी महिला उपचारासाठी दाखल झाली होती. तिला शनिवारी सहाच्या सुमारास दमा लागल्याने तेथील मुख्य परिचारीका गौरी माटल यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना त्या अनोळखी वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.