रत्नागिरी:-राज्य सरकारने पाच टप्प्यात लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला असला तरी रत्नागिरी जिल्ह्यात अनलॉकबाबत 9 जुननंतरच अंमलबजावणी होईल. जिल्ह्यात सध्या जिल्हा प्रशासन घोषित सात दिवसांचा कडक लॉकडाऊन सूरु आहे. 9 जूनपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. हा सात दिवसांचा कडक लॉकडाऊन संपुष्टात येईपर्यंत अनलॉकची प्रक्रिया हाती घेण्यात येणार नाही अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
अनलॉकच्या प्रक्रियेत जिल्ह्याचा चौथ्या टप्प्यात समावेश असून अनलॉक करताना अत्यावश्यक सेवेतील उद्योग व्यवसायांना शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 3 जून ते 9 जूनपर्यंत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी होत आहे. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री राज्य सरकारकडून पाच टप्प्यात अनलॉक करणार असल्याचा आदेश काढण्यात आला आहे. त्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले.