रत्नागिरी:- अणुस्कुरा घाटात दरड कोसळण्याची मालिका सुरूच आहे. रविवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा अनुस्कुरा घाटामुळे दरड कोसळली. दरड कोसळल्याने या घाटातून प्रवास करणारे प्रवासी अडकले. तब्बल चार तासांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरड कोसळल्याने रत्नागिरी जिल्ह्यातून कोल्हापूर आणि पुण्याला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. यामध्ये पुण्यावरून येणारी पुणे राजापूर ही एसटी तसेच अनेक अवजड वाहने सकाळी पाच वाजल्यापासून अडकून पडली होती. या मार्गावर वाहतुकीची जास्त कोंडी झाली नाही.तब्बल चार तासा नंतर या मार्गांवरील वाहतूक सुरळीत सुरु झाली.
पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्वामी कन्ट्रॅक्शन च्या माध्यमातून वाहतूक सुरळीत करण्यात आली.