रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील निवळी-गणपतीपुळे रस्त्यावरील गणपतीपुळे पेट्रोल पंप येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी ७.३० वा. च्या सुमारास घडली. भास्कर भांगरवार (२३, रा. पुणे) व संकेत अरविंद लांडे (२२, रा. आंबेगाव पुणे) अशी जखमींची नावे आहेत.
भास्कर व संकेत हे आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते. निवळी-गणपतीपुळे रस्त्याने जात असताना गणपतीपुळे पेट्रोल पंप येथे अज्ञात वाहनाने भास्कर व संकेत हे प्रवास करत असलेल्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेची नोंद रत्नागिरी जयगड पोलिसांत झाली आहे. या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.









