रत्नागिरी:-शहरातील मारुती मंदिर ते नाचणे जाणार्या रस्त्यावर अज्ञात वाहनाची धडक बसून पादचारी वृध्दाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला.
हसन अली नेवरेकर (84, रा.उद्यमनगर, रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी हसन नेवरेकर हे त्या नाट्यगृह रस्त्याकडून नाचणे असे जात असताना अज्ञात वाहनाची त्यांना धडक बसली. वाहनाच्या धडकेत ते गंभिर जखमी होउन त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अन्वर नेवरेकर (रा.उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस स्थानकात खबर दिली असून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.