रत्नागिरी:- कमरेच्या पट्ट्याने मारहाण व दुखापत केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना रविवारी (ता. ७) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास प्रमोद महाजन क्रीडा संकुलच्या बाजूला घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेहान गणी मुल्ला (वय २८, रा. निलकंठ कॉम्प्लेक्स मच्छीमार्केट, रत्नागिरी) हे दुचाकी (क्र. एमएच-०८ एवाय ७७७६) वरुन मिरकरवाडा येथे जात होते. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथील पान टपरीवर पान घेण्यास थांबले व पानाची ऑर्डर देवून लघुशंकेला जात असताना वाटेत उभे असलेल्या रिक्षा चालकास रिक्षा पुढे घेण्यास सांगितले. या कारणावरुन अज्ञात रिक्षा चालकाने फिर्यादी रेहान मुल्ला यांना कमरेच्या पट्याने मारहाण केली या प्रकरणी रेहान मुल्ला यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









