रत्नागिरी:- तालुक्यातील मालगुंड येथील तरुणाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार 4 ऑगस्ट रोजी दुपारी 3.45 ते रात्री 12 वा.कालावधीत घडली आहे. प्रणव यशवंत तोडणकर (28, रा.मालगुंड भंडारवाडा, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत त्याच्या नातेवाईकांनी जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार,शुक्रवारी दुपारी घरात कोणीही नसल्याची संधी साधत प्रणवने हॉलच्या आड्याच्या बाजुला असलेल्या लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.ही बाब त्याच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी जयगड पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे पाठवला.याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









