अखेर लांजा शहरात कडक पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात

लांजा:- दिवसांच्या अल्टिमेटमनंतर आज बुधवारी राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला. चोख पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आलेल्या या धडक मोहिमेत पत्र्याच्या शेड व पक्क्या इमारती जेसीबीने तोडण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, ज्या जमिन मालकांना अद्यापही जागेचा मोबदला मिळालेला नाही अशा पक्क्या बांधकामांवर कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र उर्वरित सर्व बांधकामे तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेत राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरीचे अधिकारी श्री. मडकईकर, ॲन इन्फ्रा कंपनीचे शितलानी, श्री. गिरी, श्री. सिंग, अमर दिवेकर, चिंतामणी कंन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर रणजित गांगण व अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.