रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील अंजणारी येथील प्रौढ झाडावरुन पडून गंभीर जखमी झाला. अधिक उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
शंकर विश्राम नरीम (३४, रा. अंजणारी नरीमवाडी, ता. लांजा) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी दि. ६ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मठ-बणकेवाडी येथे घडली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी नरीम हे झाडावर चडून झाडाच्या फांद्या तोडत असताना खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तत्काळ उपचारासाठी नातेवाईकांनी पाली येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद केली आहे.