रत्नागिरी तालुका: अर्जासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत
रत्नागिरी:- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 2 अंतर्गत एक अंगणवाडी सेविका व १३ अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरावयाची आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ३१ मार्चपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या कार्यालयात अर्ज करावयाचे आहेत.
अंगणवाडी केंद्र करबुडे-खापरेकोंड या केंद्रामध्ये अंगणवाडी सेविका ही पदे भरावयाची आहेत. अंगणवाडी केंद्र करबुडे रामगडेवाडी, करबुडे मोहितेवाडी, करबुडे मूळगाव, तरवळ कुळ्येवाडी, आगरनरळ भोईवाडी, खालगाव शिंदेवाडी, मालगुंड बौध्दवाडी, निवेंडी वरचीवाडी, वरवडे खारवीवाडा क्र. 1, चाफे वरचीवाडी, कोतवडे मुस्लिमवाडी, आरे, खरवते या १३ केंद्रांवर अंगणवाडी मदतनीस ही पदे भरावयाची आहेत. अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस पदासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गावाती रहिवासी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा किमान १८ व कमाल ३५ वर्षे अशी राहील. आवश्यक माहितीसाठी सुट्टीचे दिवस वगळून इतर कार्यालयीन दिवशी सकाळी ९.४५ ते सांयकाळी ६.१५ वाजता या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प रत्नागिरी २ यांनी आवाहन केले आहे. नमुन्यातील परिपूर्ण अर्ज स्वीकारले जातील. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व अपूर्ण अर्जाबाबत पत्रव्यवहार केला जाणार नाही, असे सांगितले आहे.