खेड:- भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या धडक कारवाईदरम्यान ४० बेदरकार वाहनचालक कारवाईच्या कचाट्यात अडकले . त्यांच्याकडून ३६ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेशिस्तपणे वाहने हाकणाऱ्यांना चाप लावून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस यंत्रणेने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे . आठवडाभरापूर्वीच जगबुडी नदीकिनारी राबवण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान १५ बेदरकार वाहनचालकांकडून ८ हजार ४० रूपयांचा दंड वसूल केला होता . पोलिसांनी ही कारवाई अधिक तीव्र करत भरणे येथेही मोहीम राबवली असता ४० जणांना पोलिसांनी दणका देत दंडात्मक कारवाई केली . ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहने हाकावीत , असे आवाहन करण्यात आले आहे.