रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणात गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी दुप्पट पाणीसाठा शिल्लक आहे. तरीसुध्दा रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणीविभागाने हा बाष्पीभवनाचा धोका ओळखून सोमवार 24 मार्च पासून आठवडय़ातील एक दिवस म्हणजेच सोमवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
शिळ धरणात पावसाळा सुरु होईपर्यंत पाणीसाठा पुरणारा असला तरी उन्हाळ्याचा तडाखा वाढल्याने शिमगा संपल्यानंतर म्हणजेच रंगपंचमीनंतर प्रत्येक सोमवारचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याबाबत विचार सुरु झाला आहे. शिळ धरणाची पाणी साठवण क्षमता 3.666 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. गेल्यावर्षी देखील यावर्षीप्रमाणा कडक उन्हाळा होता. अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाळासुद्धा लांबणीवर पडण्याची हवामान खात्याने भिती व्यक्त केली होती. त्या पार्श्वभुमीवर गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या दुसऱया आठवडय़ात 1.65 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असताना आठवडय़ातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्या नंतर एप्रिल महिन्यापासून पावसाळा सुरु होईपर्यंत प्रत्येक सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. हा पाणीपुरवठा समाधानकारक पाऊस झाल्यानंतर 4 जुलैपासून नियमित करण्यात आलेला होता.
शिळ धरणातील पाणीसाठय़ाया नुकत्या पाहणीनुसार 2.051 दशलक्ष घनमीटर पाणी असल्याचे पाणी पातळीची मोजमाप करणाऱया पाटबंधारे विभागामार्फत सांगण्यात येत आहे. रत्नागिरी शहरात सुमारे 11 हजार नळ जोडण्या आहेत. धरणातील सद्याााा हा पाणीसाठा पावसाळा नियमित होईपर्यंत पुरणारा आहे. परंतु सद्या कडाक्याचे पडणारे उन्हाने धरणातील पाणीसाठय़ाचे बाष्पीभवन त्याचप्रमाणात होऊन पाणीसाठा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणीविभागाने पाणीपुरवठा व्यवस्थाया प्रतिबंधात्मक देखभाल व दुरूस्ती करीता तसा हा बाष्पीभवनाचा धोका ओळखून पाण्याया बातीकरीता दि. 24 मार्च पासून आठवडय़ातील एक दिवस म्हणजेच सोमवारी मान्सूनाया आगमनापर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्यो मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सांगितले आहे. तरी शहरातील सर्व नागरिकांनी पाण्या काटकसरीने वापर करून न.प.ला सहकार्य करण्यो आवाहन प्रशासनाने केले आहे.