Friday, May 29, 2026
spot_img
Home खेड २२ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

२२ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

खेड:- येथील मधुसिद्धी रुग्णालयात काल रात्री (२१ मे २०२५) २२ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. रात्री २.२० वाजताच्या सुमारास त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात आणले होते. सुरज प्रभु आंधळे (वय २२, सध्या रा. ड्रामाम अपार्टमेंट, ता. खेड, जि. रत्नागिरी, मूळ रा. मांजरी, जि. पुणे) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

सुरज हा खेड येथील डेंटल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता आणि मित्रांसोबत भाड्याने राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरज काल रात्री मित्रांसोबत जेवण करून झोपला होता. मध्यरात्री त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तो मोठ्याने श्वास घेऊ लागला. ही बाब लक्षात येताच त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने खेड येथील मधुसिद्धी रुग्णालयात (डॉ. उपेंद्र तलाठी यांच्याकडे) उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आकस्मिक मृत्यू क्रमांक ५५/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.