हुरहूर… उत्सुकता… टेन्शन! दहावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचेमार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षा शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात सुरू झाली. सकाळ सत्रात स. 10.30 वाजण्यापूर्वीच परीक्षार्थी हजर होता पण त्यांयासोबत पालकवर्गानेही परीक्षा केंद्रावर मोठी गर्दी केली होती. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन ठिकठिकाणी स्वागत झाले. कोकण विभागात पहिल्या दिवशी एकाही गैरप्रकाराची नोंद झालेली नसल्यो कोकण बोर्डामामार्फत सांगण्यात आले.

ही परीक्षा 18 मार्च 2026 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. दहावी परीक्षेसाठी कोकण विभागीय मंडळामध्ये एकूण रत्नागिरी 73 व सिंधुदुर्ग 41 अशा एकूण 114 परिक्षा केंद्र आहेत. रत्नागिरी 412 तर सिंधुदुर्ग 228 माध्यमिक शाळों विद्यार्थीं 10 वी परीक्षा देत आहेत. इयत्ता 10 वी विद्यार्थी संख्या रत्नागिरी 17450 तर सिंधुदुर्ग 8327 इतकी आहे.
परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी कोकण विभागीय मंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. दोन्ही जिह्यात परीक्षा केंद्र इतकी बैठकी पथके नियुक्त करण्यात आली आहे. तर दोन्ही जिह्यात सात भरारी पथके कार्यरत होती.

सीसीटीव्ही कॅम्रेयांमुळे केंद्रांवरील परीक्षा शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे, शिवाय रेकॉर्डिंग जतन करण्याच्या सूचना केंद्रसंचालकांना दिलेल्या आहेत. जिल्हा प्रशासनाचे ही उत्तम नियोजन असल्याने सुरळीत परीक्षा पार पडत आहेत.
-राजेश क्षीरसागर,
विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर मंडळ

कोकण मंडळात गैरप्रकाराची नोंद नाही.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचेमार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षा शुक्रवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात सुरू झाली. ही परीक्षा दिनांक १८ मार्च २०२६ पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. आज कोकण विभागात एकाही गैरप्रकाराची नोंद झालेली नाही.

दहावी परीक्षेसाठी कोकण विभागीय मंडळामध्ये एकूण विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. ही परीक्षा एकूण मुख्य परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली आहे.