Thursday, October 15, 2026
spot_img
Home रत्नागिरी हातखंबा येथून राजस्थानला निघालेला २३ वर्षीय तरुण बेपत्ता

हातखंबा येथून राजस्थानला निघालेला २३ वर्षीय तरुण बेपत्ता

ग्रामीण पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा येथील ईश्वर ढाब्यावरून राजस्थानमधील आपल्या घरी जाण्यासाठी निघालेला तरुण अद्याप घरी पोहोचलेला नसल्याने खळबळ उडाली आहे. सुनीलकुमार गणपतलाल वर्मा (वय २३, रा. बिच्छपुडी, देवीपुरा, ता. शहापुरा, जि. जयपूर, राजस्थान) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. त्याचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि कामाच्या ठिकाणी शोध घेऊनही तो सापडला नसल्याने त्याचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील कुमार गणपतालाल वर्मा हा तरुण २ ऑगस्ट २०२६ ला रात्री पावणे एकच्या सुमारास तालुक्यातील हातखंबा येथील ईश्वर ढाब्यावरून राजस्थानमधील आपल्या घरी जाण्यासाठी निघाला होता. मात्र, त्यानंतर तो घरी पोहोचलाच नाही.

सुनीलकुमार हा व्यवसायाने बांधकाम क्षेत्रात काम करत असल्याची माहिती तक्रारीत नमूद आहे. तो मूळचा राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील शहापुरा तालुक्यातील बिच्छपुडी येथील रहिवासी आहे. तो बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी, मित्रपरिवाराने तसेच कामाच्या ठिकाणी त्याचा शोध घेतला. मात्र, अनेक प्रयत्न करूनही त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

सुनीलकुमार हा अद्याप घरी परतला नसल्याने आणि त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने त्याचे अपहरण करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अमरचंद प्रभातराम यादव (वय ३६, व्यवसाय बांधकाम, सध्या रा. मु.पो. कट्टा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग; मूळ रा. बिच्छपुडी, ता. शहापुरा, जि. जयपूर, राजस्थान) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून सोमवारी (ता.१२) सायंकाळी सहावाजता ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.