रत्नागिरी:- स्वप्नाली सावंत खून प्रकरणातील तिचा पती संशयित मुख्य आरोपी सुकांत सावंतने आपल्याला पोलिस कोठडीत ठेवून मारहाण केल्याबाबतचा आरोप न्यायालयाने बुधवारी फेटाळला. परंतू त्याला बेकायदेशिरपणे 8 ते 11 सप्टेंबर पर्यंत पोलिसांनी डांबून ठेवल्या प्रकरणातील त्याचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर केला. याप्रकरणी सुकांत सावंतच्या वकिलांनी सीसीटिव्ही फुटेजची मागणी केलेली होती.त्यावर उपविभागीय अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेने फूटेज आपल्याकडे उपलब्ध नसल्याच अहवाल सादर केला होता. यावर न्यायालयाने ताशेरे ओढले असून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयातील निर्देशातील नमूद तरतुदींचे स्पष्टपणे उल्लंघन करणार असल्याने याची गंभिरपणे नोंद घेतली आहे.
11 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2022 या कालावधीत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस कोठडी सुनावण्यात येई पर्यंत संशयितांनी पोलिसांनी शारिरीक मारहाण तसेच मानसिक छळ करुन खूनाचा कबुली जबाब देण्यासाठी पोलिस दबाव आणत असल्याची तक्रार केलेली नाही. अशा प्रकारे त्यांच्यावर दबाव किंवा मारहाण करण्यात आली असती तर त्यांनी त्याची तक्रार पोलिस कोठडी मागणीच्यावेळीच केली असती. तसेच संशयितांना मारहाण झाल्याचा कोणताही वैद्यकिय पुरावा नसल्याने हा तक्रार अर्ज फेटाळण्यात आला. तसेच सीसीटिव्ही फूटेज प्रकरणात न्यायालयाने पोलिस अधिक्षक रत्नागिरी यांनी जिल्ह्याचे प्रमुख व त्यांच्या विभागाचे पालक या नात्याने संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटिव्हीचे फूटेज संरक्षीत करण्याची योग्य ती तरतूद करणे आवश्यक होते. परंतू तशी कोणतीही तरतूद केली नसल्याने उपविभागीय अधिकारी व पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पालन न केल्याचे स्पष्ट होत असल्याने याची गंभिर ददखल घेतली आहे. तसेच 10 सप्टेंबर रोजीचे दिवसभराचे शहर पोलिस ठाण्यातील सर्व सीसीटिव्ही फूटेज या खटल्याच्या सत्र न्यायालयातील सुनावाणीपर्यंत संरक्षित ठेवण्यात यावेत असे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी आर.एम.चौत्रे यांनी दिले.









