प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीसाठी नगर परिषदेचा निर्णय
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाने सोमवार, दिनांक १५ डिसेंबर रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या दिवशी सकाळपासून सायंकाळपर्यंत शहराच्या कोणत्याही भागात पाणीपुरवठा होणार नाही. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नगर परिषदेने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी याची नोंद घ्यावी आणि उपलब्ध पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा.
पाणीपुरवठा विभाग सोमवारचे काम पूर्ण करून मंगळवारपासून पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करेल. नागरिकांनी या काळात नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.









