सोने व्यापारी खून प्रकरणात तिघांना 3 दिवस पोलिस कोठडी

रत्नागिरी:- ठाणे येथील सोने व्यापारी किर्तिकुमार कोठारी यांच्या यांच्या खून प्रकरणातील तिघांना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

किर्तीकुमार कोठारी हे 19 सप्टेंबर रोजी रत्नागिरीत आले असता बेपत्ता झाले होते. पोलिस तपासात त्यांचा खून झाल्याचे उघड झाले. हा खून भूषण सुभाष खेडेकर (42, खालची आळी, रत्नागिरी), रिक्षा चालक महेश मंगलप्रसाद चौगुले (39, रा. मांडवी, सदानंदवाडी, रत्नागिरी), फरीद महमूद होडेकर (36, रा. भाट्ये, खोतवाडी,रत्नागिरी) यांनी गुन्ह्याची कबुली दिली होती. न्यायालयात त्यांना 28 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज तिघांची पोलिस कोठडी संपल्याने पुन्हा न्यायालयात नेण्यात आले. यावेळी पोलिसांनी न्यायालयाकडे अजून चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडी मागितली. कोर्टाने  3 दिवसांची म्हणजे 1 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.