रत्नागिरी:- बेशुद्ध अवस्थेतील महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. संगिता रमेशचंद्र केसरकर (वय ५२, रा. अरीहंत नगर, साळवी स्टॉप, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १३) दुपारी पावणेदोनच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत संगिता केसरकर यांना २० वर्षापासून थायरॉईड व ब्लडप्रेशरचा आजार होता. शुक्रवारी रात्री पासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. मध्यरात्री त्या बेशुद्ध पडल्या त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.









