सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या प्रौढाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या प्रौढाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनायक राजाराम जोशी असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ११) रात्री साडेआठच्या सुमारास शिवाजीनगर येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करताना आढळला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.